पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल; साईंबाबांच्या दर्शनानंतर करणार सभेला संबोधित

आरएसएसच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने कायदा करावा असे म्हटले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेले साडेचार वर्षे आयोध्येत एकदाही का गेले नाहीत? असा सवाल उद्धव यांनी विचारला होता.

पंतप्रधान मोदींचे शिर्डी विमानतळावर स्वागत (Image Credit: ANI)

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये शुक्रवारी (१९ ऑक्टोंबर) दाखल झाले. राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे शिर्डी विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी मंदिरात जाऊन साईबाबांच दर्शन घेतले. यानंतर आता ते सभेला संबोधित करणार आहेत.  शिर्डी साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी ते शिर्डीत आले आहेत.

दरम्यान, काल (गुरुवार, १८ ऑक्टोबर) दसऱ्या दिवशी मुंबईत झालेल्या शिवसेना दसरा मेळावा तसेच, नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याबाबत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नागपूर येथील आरएसएसच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने कायदा करावा असे म्हटले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेले साडेचार वर्षे आयोध्येत एकदाही का गेले नाहीत? असा सवाल उद्धव यांनी शिवाजी पार्कवरील मैदानातील मेळाव्यातून विचारला होता. (हेही वाचा, तिजोरीत खडखडाट तरीही, मोदींच्या कार्यक्रमासाठी २ कोटींचा चुराडा करण्याचा राज्य सरकारचा घाट)

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये कडेकोठ बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डी परिसराला पोलीसी छावणीचे स्वरुप आल्याचे पहायला मिळत आहे. १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी साईबाबांच्या समाधीस १०० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने साई संस्थानच्यावतीने वर्षभर १ ऑक्टोंबर २०१७ ते १८ ऑक्टोंबर २०१८ या कालावधत शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. याच सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीत आले आहेत.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Central Railway: मध्य रेल्वेच्या 14 स्थानकांवर 5 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंदी; वर्ष अखेरीस गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुट्ट्यांचा वर्षाव; बँक कामांचे आताच करा नियोजन, जाणून घ्या हॉलिडे लिस्ट

Beed Morcha: धनंजय मुंडे यांची विकेट? वाल्मिक कराड यांच्या अटकेची शक्यता; Santosh Deshmukh हत्या प्रकरणी बीड येथे विराट मोर्चा; देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर दबाव

Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार