Maharashtra Politics: पती वैजनाथ वाघमारे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेशावर शिवसेना नेत्या सुष्मा अंधारेंची पहिली प्रतिक्रीया

शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

Sushma Andhare | (Photo Credit - Facebook)

सध्या राज्यात सत्ताधारी पक्ष विरुध्द विरोधीपक्ष अशी लढाई नाही तर शिंदे गट (Shinde Group) विरुध्द ठाकरे गट (Thackeray Group) असा सामना रंगला आहे. रोज या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप, इनकमिंग-आउटगोइंग (Incoming Outgoing) अशा मालिका बघायल मिळतात. पिता इकडे तर पुत्र तिकडे. पत्नी या बाजूला तर पती दुसऱ्या बाजूला. दुष्मन कादुष्मन मेरा दोस्त असचं काहीस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) रंगलं आहे.  पण आज राज्याच्या राजकारणात विषय रंगला आहे तो सुष्मा अंधारे (Sushma Andhare) आणि त्यांचे पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांचा. वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी वैजनाथ वाघमारे यांनी शिवसेना नेत्या सुष्मा अंधारेंबाबत काही मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. सुष्मा अंधारेंची वकीली डिग्री ही बोगस डिग्री (Bogus Degree) आहे असा गौप्यस्फोट वैजनाथ वाघमारे यांनी केला आहे. तरी पक्षात प्रवेस केल्यानंतर याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेत मी याबाबतची माहिती देणार आहे असं वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं आहे.

 

तर यावर प्रत्त्युत्तर देत शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेतली आहे. गेली ४ वर्ष आम्ही विभक्त राहतोय. विभक्त पतीच्या आरोपावर मी काहीही प्रतिक्रीया देणार नाही. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. माझ्याकडून त्यांच्या पुढील कारकीर्दीला शुभेच्छा. मी रडणारी नसून लढणारी आहे, राजकीय पटलावर योग्य वेळी योग्य प्रश्नांची उत्तरे देईन, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- UddhavThackeray यांना आणखी एक धक्का; Sushma Andhare यांचे दुरावलेले पती Vaijnath Waghmare आज करणार बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश)

 

सुष्मा अंधारे यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तरी त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर त्या चांगल्याचं चर्चेत आल्या. किंबहुना शिवसेना खासदार संजय राऊत अटकेत असताना भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस भाषेत समाचार घेणाऱ्या नेत्या सुष्मा अंधारेचं होत्या. त्यामुळे सुष्मा अंधारे हे नावं गेले काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. तरी त्याच्या पतीच्या शिंदे गटात येण्याने अंधारेंच्या भुमिकेवर काय फरक पडणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now