Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधी विरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात

त्यांनी याविरोधात याचिका दाखल केली असून तातडीची सुनावणी होण्याचा अंदाज आहे.

Vidhan Bhavan | File Image

महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणूकींच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Dates) तारखा दुपारी जाहीर होणार आहेत. अशामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. पण 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट हायकोर्टात गेला आहे. त्यांनी याविरोधात याचिका दाखल केली असून तातडीची सुनावणी होण्याचा अंदाज आहे.

राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणामध्ये हायकोर्टाचा अंतिम निर्णय राखीव असताना त्यांची नियुक्ती करणं असंविधानिक असल्याचं ठाकरे गटाचं मत आहे. कोल्हापूरचे ठाकरे गटाचे याचिका कर्ते सुनील मोदी त्याविरूद्ध कोर्टात गेले आहेत. सकाळी 10:30 वाजता मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे शपथविधीच्या स्थगितीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान निकाल राखून ठेवताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला कोणतेही निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे नियुक्त्या कायदेशीर असल्याचा दावा सरकार कडून करण्यात आला आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूकांच्या आज जाहीर होणार तारखा; दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद .

वरूण सरदेसाई यांनी ट्वीट करत उपस्थित केला सवाल

महायुती कडून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये भाजपाकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी दिली आहे तर शिवसेनेकडून मनिषा कायंदे, हेमंत पाटील आणि एनसीपी कडून पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे. आज दुपारी त्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देणार आहेत.