Maharashtra Politics: रोहित पवारांसह शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस
अनिल देशमुख,राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या शरद पवार गटातील आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. विधीमंडळाने शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदारांना नोटीस बजावली. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करु नये अशी याचिका अजित पवार (Ajit Pawar) गटाने विधीमंडळात दाखल केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आलीये. आतापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजाववण्यात आली आहे. शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. (हेही वाचा - 'मराठा आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना विठूरायाच्या शासकीय पूजेचा मानही नाही; सकल मराठा मोर्च्याने आक्रमक होत दिला इशारा!)
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात फुट पडली आणि पक्षावर दावा करण्यात येऊ लागला. त्यानंतर पक्ष, चिन्ह यांची लढाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख,राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या शरद पवार गटातील आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. तसेच नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी देखील कोणतीही नोटीस बजावली नाही.
अजित पवार गटाला पाठिंबा न दिल्यामुळे आपल्याला अपात्र का करु नये याबाबत अजित पवार गटाकडून याचिका विधीमंडळात करण्यात आली होती. त्यावर म्हणणं मांडण्यासाठी शरद पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आलीये.