Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 247 जणांना कोरोनाची लागण दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र पोलिस दलाकडून त्यांच्या कर्मचार्यांसाठी विशेष खबरदारी घेतली आहे.
महाराष्ट्र पोलिस दलामध्ये आज (16 सप्टेंबर) मागील 24 तासांत 247 जणांना कोरोनाची लागण झाली असून दोन पोलिस कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या मागील 6 महिन्यांपासून कोरोना व्हायरसचा फैलाव झपट्याने होत असतानादेखील फ्रंट लायनर म्हणून आरोग्य कर्मचार्यांसोबतच महाराष्ट्र पोलिस दल देखील काम करत आहे. दरम्यान आत्तापर्यंत पोलिस खात्यात 20,003 जणांना कोरोनाची लागण झाली असून 204 जणांची कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे. सध्या राज्यात 3728 कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्यांवर उ पचार सुरू आहेत.
महाराष्ट्र पोलिस दलामध्ये एकूण 16 हजार 71 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाकडून त्यांच्या कर्मचार्यांसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. सातार्या जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिले केवळ पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. दरम्यान त्याचं उद्घाटन देखील व्हर्च्युअल माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
ANI Tweet
ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आज ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रकृतीची काळजी घेण्याचं, आराम करण्याचं आवाहन त्यांना ट्वीट च्या माध्यमातून केलं आहे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी नाके बंदीसाठी पोलिस तैनात आहेत. तसेच मास्कचा वापर न करणार्यांकडून, नियमांचं उल्लंघन करत लॉकडाऊनचे नियम मोडणार्यांवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.