Maharashtra New COVID-19 Guidelines: कोरोना निर्बंध शिधील,14 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली

राज्य सरकारने कोविड-19 महामारी काळात लागू केलेले प्रतिबंध मोठ्या प्रमाणावर शिथील केले आहेत. राज्य सरकारने याबाबत एक नवी नियमावली (Maharashtra New COVID-19 Guidelines) आजच (2 फेब्रुवारी) जारी केली आहे. ही नियमावली येत्या 4 मार्चपासून लागू असणार आहे. प्रामुख्याने ही नियमावली 14 जिल्ह्यांसाठी असेल.

Maharashtra New COVID-19 Guidelines: कोरोना निर्बंध शिधील,14 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

राज्य सरकारने कोविड-19 महामारी काळात लागू केलेले प्रतिबंध मोठ्या प्रमाणावर शिथील केले आहेत. राज्य सरकारने याबाबत एक नवी नियमावली (Maharashtra New COVID-19 Guidelines) आजच (2 फेब्रुवारी) जारी केली आहे. ही नियमावली येत्या 4 मार्चपासून लागू असणार आहे. प्रामुख्याने ही नियमावली 14 जिल्ह्यांसाठी असेल. त्यामुळे या जिल्ह्यांतील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे 100% क्षमतेने सुरु होतील. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र 50% ही अट कायम असणार आहे.

राज्य सरकारने ज्या 14 जिल्ह्यांमध्ये 100% क्षमतेची मुभा दिली आहे त्यात, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पुणे, भंडारा,सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समवेश आहे. उर्वरीत जिल्ह्यांना 50% उपस्थितीत नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 100% उपस्थितीची परवानगी मिळण्यास काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने आज जाही केलेल्या नव्या नियमावलीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांना एकूण क्षमतेच्या 50% इतकी परवानगी देण्यात आली आहे. या जिल्ह्यांमधील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये मात्र पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2022 06:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).