Maharashtra: उल्हासनगर येथे मोबाइल आणि ईअरफोनसाठी तरुणाची हत्या, आरोपीला अटक

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आरोपी एका घटनेनंतर एक असे विविध गुन्हे करण्यासाठी धाडस करत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा उल्हासनगर कॅम्प चारच्या विठ्ठलवाडी परिसरात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Maharashtra:  महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आरोपी एका घटनेनंतर एक असे विविध गुन्हे करण्यासाठी धाडस करत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा उल्हासनगर कॅम्प चारच्या विठ्ठलवाडी परिसरात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने एका तरुणाची हत्या केली आहे. उल्हासनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली असून या गुन्हाचा पर्दाफाश केला आहे.

या संबंधित डीसीपी यांनी असे म्हटले की, सुभाष टेकडी साई बाबा नगर स्थित सोनगियाची वाडी परिसरात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर सोनवणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी असे म्हटले की, रात्रीच्या वेळेस ज्ञानेश्वर सोनवणे आणि सुरेश शिंदे उर्फ सोनगिया हे दोघे एकत्रित दारु प्यायला बसले होते. याच दरम्यान मोबाइल आणि ईअरफोनवरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला.(Thane Rape Case: ठाण्यामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर मामानेच केला बलात्कार, पोलिसांकडून आरोपीला अटक)

दोघांमधील वाद ऐवढा टोकाला गेला की, सुरेश याने चाकूने ज्ञानेश्वरवर हल्ला करत त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच तपास ही सुरु केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश याला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

दरम्यान, नेताजी चौकाच्या बंगला परिसरात जुन्या वादावरुन एका तरुणाची सकाळच्या वेळेस हत्या करण्यात आली होती. सुशांत गायकवाड या तरुणाची जुन्या वादावरुन काही लोकांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement