IPL Auction 2025 Live

Maharashtra Monsoon Update: मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात वरुनराजा बरसला; पाहा कोणकोणत्या ठिकाणी पडला पाऊस

मुंबई शहरात पावसाची हजेरी तितकी उल्लेखननिय नव्हती. मात्र, दहीसर ते अंधेरी या भागात पश्चिम उपनगरांमध्ये तर पूर्व उपनगरांमध्ये पवई, भांडुप, कांजूरमार्ग परिसरात पावसाची कामगिरी दमदार राहिली. मध्य रेल्वे मार्गावर येणाऱ्या ठाणे शहर आणि परिसरातही चांगलाच पाऊस कोसळला.

Maharashtra Monsoon | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Monsoon Update: अलिकडे हवामान विभागाचा अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरताना दिसत आहे. सोमवारीही याची प्रचिती आली. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजधानी मुंबई (Mumbai Rain), उपनगरं आणि उर्वरीत महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला नाममात्र हजेरी लावरत गायब झालेल्या पावसानो सोमवारी पुन्हा एकदा दर्शन दिले. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून आणि उर्वरीत महाराष्ट्राला पावसाच्या प्रतिक्षेपासून काहीसा दिलासा मिळाला. फारसा दमदार म्हणता येईल असा नसला तरी, पावसाचे आगमन झाले याचाच नागरिकांना आनंद झाल्याचे दिसते.

मुंबईत कोणत्या ठिकाणी पाऊस?

मुंबई शहर आणि उपनगर परिसरात खास करुन पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर परिसरात पावसाने सोमवारी सकाळपासून हजेरी लावली. मुंबई शहरात पावसाची हजेरी तितकी उल्लेखननिय नव्हती. मात्र, दहीसर ते अंधेरी या भागात पश्चिम उपनगरांमध्ये तर पूर्व उपनगरांमध्ये पवई, भांडुप, कांजूरमार्ग परिसरात पावसाची कामगिरी दमदार राहिली. मध्य रेल्वे मार्गावर येणाऱ्या ठाणे शहर आणि परिसरातही चांगलाच पाऊस कोसळला. (हेही वाचा, बुलडाणा : वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळले, आईसह दोन लहानग्यांचा दुर्देवी मृत्यू)

पावसाचा शिडकावा आणि पर्जन्यमापन यंत्रावर झालेली नोंद

दरम्यान, आकाशात फारसा ढगाळपणा नसताना पडलेल्या या पावसाचा पहिला शिडकावा कुलाबा येथे सोमवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० तर, सांताक्रूझ येथे सकाळी ७.४ वाजता नोंदविण्यात आला. माहापालिकेच्या पर्जन्यमापन यंत्रावर या पावसाची नोंद शहरामत ५.५१ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये ७.१५ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये १३.४३ मिलीमीटर इतकी झाली. दरम्यान, मुंबई शहर आणि परिसरात मंगळवारीही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज काय?

मान्सून पोहोचल्याने मराठवाडा आनंदीत, पण दमदार पावसाची प्रतिक्षा

आजवरचा इतिहास पाहता अपवाद वगळता मान्सून नेहमी कोकण, मुंबईत पहिल्यांदा दाखल होतो. यंदा मात्र, मुंबईच्याही आदी मान्सून उर्वरीत महाराष्ट्रात पोहोचला. यंदा हा अपवाद पाहायला मिळाला. अरबी समुद्रातील मान्सून शाखेच्या तुलनेत बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा अधिक सक्रीय असल्याने असे घडल्याचे हवामान अभ्यासक सांगतात. दरम्यान, मान्सून मराठवाड्यात पोहोचला आहे. मान्सूनच्या काही सरीही मराठवाड्यात कोसळल्या. मात्र, दमदार मान्सून पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.