Maharashtra Monsoon Update: दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण तर मुंबईसह अनेक भागांतून पावसाची माघार- IMD
त्याचबरोबर मुंबईत आज निरभ्र वातावरण राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पावसाने आता पूर्णपणे विश्रांती घेतली असून परतीची वाट धरली आहे. येत्या 28 ऑक्टोबर पर्यंत पाऊस संपूर्ण देशातून नाहीसा होईल असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असून असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची यत्किंचितही शक्यता दिसत नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणासह त्याच्या लगतच्या क्षेत्रात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यांतून पावसाची परतीची वाट धरली असून मुंबईसह (Mumbai) अनेक भागात पाऊस नाहीसा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या दक्षिण भागात येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस माघार घेईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबईत आज निरभ्र वातावरण राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. Maharashtra Rains Update: पुणे,साता-यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वा-यासह पावसाची शक्यता, तर उद्यापासून पाऊस परतीच्या वाटेवर- IMD
सध्या संपूर्ण देश सणासुदीच्या लगबगीला लागला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद महाराष्ट्रात झाली. या पावसाने सर्व धरणे पूर्णपणे भरली असून त्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. मात्र परतीच्या मुसळधार पावसाने मात्र शेतीचे, पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. हा परतीचा पाऊस 1-2 दिवसात आपला राज्यातील मुक्काम संपवून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.