IPL Auction 2025 Live

Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता- के एस होसाळीकर

तर महाराष्ट्रात देखील अनेक नदींना पूर आला आहे. मुंबईत मात्र समाधानकारक पाऊस पडला नाही. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 4 ते 5 दिवसात मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र मुंबईत (Mumbai) मात्र पावसाने दडी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असून उकाडा जाणवायला लागला आहे. यामुळे मुंबईकरही त्रस्त झाले असून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातही अतिमुसळधार पाऊस पडेल असेही सांगण्यात येत आहे.

देशात अनेक राज्यांत पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर महाराष्ट्रात देखील अनेक नदींना पूर आला आहे. मुंबईत मात्र समाधानकारक पाऊस पडला नाही. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 4 ते 5 दिवसात मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- Mumbai Water Cut: मुंबई सह ठाणे, भिंवडी भागामध्ये 5 ऑगस्ट पासून 20% पाणीकपात

मुंबई मध्ये यंदा सरासरी पाऊस पडला असला तरीही यंदा तो पाऊस तलावक्षेत्रामध्ये अपेक्षेप्रमाणे न पडल्याने आता मुंबई महानगर पालिका 5 ऑगस्ट पासून 20% पाणी कपात करण्याच्या तयारीमध्ये आहे. आज बीएमसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या तलावक्षेत्रामध्ये केवळ 34 % पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान मागील वर्षी याच सुमारास मुंबईच्या तलाव क्षेत्रात 85.68% पाणीसाठा होता. तर 2018 साली हा पाणीसाठा 83.30% इतका होता.