Maharashtra Monsoon Session 2019: महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन यंदा पुन्हा मुंबई मध्ये; 17 जूनपासून होणार सुरूवात
17 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.
Maharashtra Monsoon Session 2019 Date: मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने मुंबई (Mumbai) ऐवजी नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनाचा घाट घातला होता मात्र पावसामुळे कामकाज ठप्प झाल्याने आता यंदा पुन्हा पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) मुंबईत घेतले जाणार आहे. 2019 सालचे पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. 17 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अधिसूचना काढून ही माहिती दिली आहे.
यंदा लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन यंदा परंपरेनुसार नागपूर येथेच पार पडणार आहे.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी असतो. निधीही संपलेला असतो. त्यामुळे विदर्भातील जनतेला न्याय देता येत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले होते मात्र आता पुन्हा ते मुंबईत परतणार आहे.