Maharashtra Monsoon Forecast: मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; मुंबई ढगाळ वातावरण
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु, आज मराठवाड्यातील काही भागांत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईसह उपगनरात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु, आज (26 सप्टेंबर) मराठवाड्यातील (Marathwada) काही भागांत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत (Mumbai) सकाळपासून ऊन पडले असले तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरणतही अनुभवायला मिळेल, अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान, 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह परतीचा पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Monsoon Updates 2020: 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता- IMD)
K S Hosalikar Tweet:
Good morning friends. Today's rainfall for forecast for Maharashtra.
Possibility of mod rains associated with TS, lightning in parts of Marathwada region. Rest of the places there could be mod TS at isolated places.
Mumbai, partly cloudy sky. Right now sunny morning. pic.twitter.com/8t6LnlIRix
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 26, 2020
1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं.
दरम्यान, यंदा अपेक्षित पाऊस झाला असून जुलै महिन्यात, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या अखेरीस पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यंदा झालेल्या पावासामध्ये अनेक रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले. भिंती कोसळून घरांचे, इमारतींचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडले. जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या सगळ्यात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध झाले, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2020 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

