Maharashtra MLC Election Results 2023 Updates: विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत, धक्कादायक रस्सीखेच; पाहा तपशील
औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur), कोकण (Konkan) शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक तसंच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडली
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी (Maharashtra MLC Election Results 2023 Updates) आज (2 फेब्रुवारी) सुरु झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur), कोकण (Konkan) शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक तसंच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडली. सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये महाविकासआघाडी विरुद्ध सत्ताधारी भाजप असा सामना रंगला. मात्र, राजकीय पक्षांनी उमेदवार निवड आणि बंडखोरी आदींवरुन घातलेला घोळ पाहता सामना आणिखीच उत्कंटावर्धक झाला. परिणामी आज मतमोजणीदरम्यान, जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे.
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ- औरंगाबाद, नागपूर, कोकण
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ- नाशिक, अमरावती
प्राप्त माहितीनुसार, सध्यास्थितीत कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मतमोजणीपूर्वी सुरुवातीला सर्व मतदान पत्रिका एकत्र केल्या जातात. त्यानंतर या मतपत्रिकांमधून बाद मतपत्रिका बाजूला काढल्या जातात. त्यानंतर उमेदवारांच्या विजयाचा कोठा ठरवला जातो. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी ही एक वेळ खाऊ प्रक्रिया असते. अनेकदा ही प्रक्रिया पूर्ण होण्यास चार ते पाच तास लागतात. कधी कधी त्याहीपेक्षा अधिक विलंब लागू शकते. (हेही वाचा, Maharashtra MLC Elections Results On ABP Majha and TV9: विधान परिषदेसाठी महाराष्ट्रात निकराची लढत; 'या' ठिकाणी पहा निकालाचे Live Streaming)
दरम्यान, यंदा कधी नव्हे इतकी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणूक गाजली. राज्यात नाट्यमयरित्या झालेले सत्तांतर. त्यानंतर बदललेली निवडणुका आणि प्रचाराची समिकरणे. उदयास आलेल्या नव्या उघड-छुप्या आघाड्या, युत्या. त्यातच उमेदवार निवडीपासून ते थेट बंडखोरी आणि नंतर दिलेला काढलेला पाठिंबा. यांसह इतर अनेक कारणांमुळे निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चिली गेली. आज या निवडणुकीचा निकाल आहे. निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.