Maharashtra MLC Election 2020: भाजपकडून 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' मोर्चेबांधणीस सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांची इच्छुकांशी चर्चा?

नागपूर पदवीधर मतदार संघातून आमदार अनिल सोले यांच्या निवृत्तीनंतर त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पक्षात खल सुरु असल्याचे समजते.

Maharashtra Legislature | (Archived images)

निवडणूक कोणतीही असली तरी ती नेहमीच अधिक सक्रियतेने लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' (Graduate Constituency Elections) हे मिशन हाती घेतल्याचे वृत्त आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेनेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नुकतेच नागपूर (Nagpur ) मुक्कामी आले. या वेळी त्यांनी शहरातील कोरोना व्हायरस स्थितीचा आढावा घेतला. मात्र, सोबतच त्यांनी 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' संदर्भातही पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. या चर्चेबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020 (Maharashtra MLC Election 2020) मध्ये रिक्त झालेल्या पदवीधर मतदारसंघातील जागांचाही समावेश आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर अपले उमेदवार पुन्हा निवडूण आणण्यासाठी राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नागपूर पदवीधर मतदार संघातून आमदार अनिल सोले यांच्या निवृत्तीनंतर त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पक्षात खल सुरु असल्याचे समजते. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला? पाहा कोणाच्या नावाची चर्चा?)

नागपूरचे महापौर स्पर्धेत?

दरम्यान, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी यापूढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असा निर्धार जाहीर केला. संदीप जोशी यांच्या निर्धारावरुन ते विधानपरीषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा अर्थ अनेकांनी काढला आहे. त्यामुळे आगामी 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' उमेदवारांच्या स्पर्धेत संदीप जोशी हे प्रमुख दावेदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फडणवीसांकडून कोरोना स्थितीचा आढावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहरातील कोरोना व्हायरस स्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाण मांडून बसले असले तरी, दरम्यानच्या काळात राजकीय रणनितीवरही चर्चा होत आहे. आगामी 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' डोळ्यासमोर ठेऊन नागपूर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत.

दरम्यान, 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' लढविण्यासाठी भाजपमधून इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीसाठी कोणाच्या गळ्यात माळ घालतो याबाबत उत्सुकता आहे. या आधी पार पडलेल्या विधानपरीषद निवडणुकीत भाजपने चार नवख्या चेहऱ्यांना संधी दिलीहोती. त्यामुळे या वेळी भाजप पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रा. अनिल सोले यांना पुन्हा संधी देणार की संदीप जोशींना उमेदवारी देणा की, या दोघांऐवजी नवाच कोणता चेहरा पुडे आणणार याबाबत उत्सुकता आहे.