Maharashtra Ministry Distribution: अखेर खातेवाटपाचा मुहूर्त ठरला, राज्यपालांच्या मंजुरीसाठी यादी राजभवनावर सादर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात लवकरच खातेवाटप होणार असून संबंधीत यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राजभवन येथे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकार स्थापन होवून तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतर राज्याच्या मंत्री मंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. आता मंत्रीमंडळाच्या खाते वाटपावरुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) जोरदार टीका होताना दिसत आहे. 18 आमदारांचा शपथ विधी पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिल्या जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं आहे. तरी या संबंधीत मोठी माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रीमंडळात लवकरच खातेवाटपावर होणार असून ही यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राजभवन येथे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खाते वाटपाच्या प्रश्नावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), नाना पटोले (Nana Patole) यांसारख्या बड्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवताना दिसतात. तरी राज्यातील जनतेला देखील खाते वाटप कधी होणार असा प्रश्न पडला आहे. पण जर हाती येत असलेल्या माहितीनुसार जर , राज्यपालांच्या मंजुरीसाठी यादी राजभवनावर सादर करण्यात आली असेल तर पुढील दोन दिवसात खाते वाडप होण्याची दाट शक्यता आहे. सरकार स्थापनेपासून धक्कातंत्र वापरणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही सगळ्यांचे अंदाज चुकवणारे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या खातेवाटपाकडे लागले आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सध्या पहिल्या टप्प्यात 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.(हे ही वाचा:- Vinayak Mete Accidental Death: विनायक मेटेंचा कार चालक पोलिसांच्या ताब्यात, अपघातातील सर्वात मोठी अपडेट!)
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आमदारांनी तर शिंदे गटातील 9 आमदारांनी म्हणजेच एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापैकी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, सुरेश खाडे,रविंद्र चव्हान, अतुल सावे आणि मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर शिंदे गटातील दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, शंभूराज देसाई या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तरी यापैकी कुणाला कुठही मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.