Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी (Sagarlakshmi), महा. गजलक्ष्मी सोम (Maha.Gajalakshmi Mon), गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी (Ganeshlakshmi Bhagyalakshmi), महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi) लॉटरींची सोडत आज सोमवारी दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाहीर होतो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता. लॉटरी खेरदी शिवाय लॉटरी निकाल कुठे पहाल हाही महत्त्वाचा प्रश्न असतो. त्याची चिंता नाही. कारण, निकाल तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता. त्याबाबतची माहिती खाली दिली आहे.
आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. सागरलक्ष्मी लॉटरीची एकूण 5,250 बक्षीसे आहेत. महा.गजलक्ष्मी सोम लॉटरीची एकूण 1,175 बक्षीसे आहेत. गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी लॉटरीची एकूण 861 बक्षीसे आहेत. महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची एकूण 441 बक्षीसे आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
- यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
- पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
- या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
प्रत्येकाला आपण कमी वेळेत श्रीमंत व्हाव असं वाटत. मात्र, सट्टेबाजी, मटका, यात अनेक वेळी फसवणूक होते. मात्र, ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे. त्यामुळे लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. अनेकांचे घराचे, शिक्षणाचे, उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.