Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

Representative Images

Maharashtra Lottery Results: पद्यिनी (Padyini), महा. गजलक्ष्मी मंगळ (Maha Gajalakshmi Mangal), गणेशलक्ष्मी शुभ (Ganeshlakshmi Shubh), महा. सह्याद्री महालक्ष्मी (Maha Sahyadri Mahalakshmi) लॉटरींची सोडत आज मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. प्रत्येक सोडत ही दर १५ मिनिटींच्या फरकाने होते. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी ती चेक करू शकता. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये पद्यिनीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी मंगळ ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. त्याशिवाय, लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. त्याशिवाय, लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.