Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
गेल्या 5 वर्षात हजारो जण लखपती, शेकडो जण करोडपती झाले आहेत. तुम्ही ही तुमचे नशीब आजमाऊ शकता.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी (Maharashtra Lakshmi), महा.गजलक्ष्मी शनि (Maha Gajalakshmi Shani), गणेशलक्ष्मी समृद्धी (Ganeshlakshmi Gaurav), महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी (Maha Sahyadri Draupalaxmi) लॉटरींची सोडत आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्येक पंधरा मिनीटांच्या अंतराने उर्वरित लॉटरी जाहीर केल्या दातात. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये महाराष्ट्रलक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.गेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्यात उतरविले आहे. प्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
- यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
- पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
- या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि आदी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकार लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग करते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा चिठ्ठ्यांमधून निवडले जातात. अशा रितीने केलेली सोडत ही पारदर्शक आणि विश्वासार्ह असते.
आयुष्यात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे. जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते.