Maharashtra Lockdown: टास्क फोर्सकडून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी, कॅबिनेटकडून 14 एप्रिल पर्यंत निर्णय जाहीर करण्याची शक्यता

त्यामुळे यावरील अंतिम निर्णय हा आधीच्या लॉकडाऊन पेक्षा अधिक कठोर असल्याची शक्यता आहे. कारण राज्यात कोरोनाच्या रुग्णांची तुफान वाढ होत असून सध्याच्या विकेंड लॉकडाऊनचा त्यावर कोणताच परिणाम होताना दिसून येत नाही आहे.

प्रतिकात्मक फोटो crowd (PC - ANI)

Maharashtra Lockdown:  राज्यात अद्याप पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावरील अंतिम निर्णय हा आधीच्या लॉकडाऊन पेक्षा अधिक कठोर असल्याची शक्यता आहे. कारण राज्यात कोरोनाच्या रुग्णांची तुफान वाढ होत असून सध्याच्या विकेंड लॉकडाऊनचा त्यावर कोणताच परिणाम होताना दिसून येत नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील बडे   प्रशासकीय अधिकारी आणि टास्क फोर्स सोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतरच कॅबिनेटमधील मंत्र्यांशी बातचीत करुनच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. रविवारी पार पडलेल्या बैठकीत कोविड टास्क फोर्सकडून राज्यात 8-14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ब्रेक द चेन च्या माध्यमातून कोरोनची साखळी तुटण्यास मदत ही होईल असे टास्क फोर्सने म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयानुसार, गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या परिस्थितीचा जो अनुभव आला आहे त्याच्या आधारावर प्राथमिक SOP तयार केली गेली होती. तसेच ज्या नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे त्यांना सुद्धा काही नियम मोडणाऱ्यांमुळे कोविडची लागण होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा एकमात्र सध्या पर्याय समोर असून कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. तर आतासुद्धा SOP संदर्भात चर्चा करुन ती प्राथमिक स्वरुपात तयार केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानात म्हटले आहे.(धक्कादायक! कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे दुकान बंद झाल्याने उस्मानाबादेत सलून मालकाची आत्महत्या)

उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा टास्क फोर्स सोबत बैठक घेणार असून कमर्शिल आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनीधींसोबत सुद्धा बातचीत करणार आहेत. राजयाचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अशी अपेक्षा केली आहे की, लॉकडाऊनमुळे ज्या लोकांना याचा फटका बसेल त्यांना आर्थिक मदत देऊ करावी. याबद्दलचा प्रस्ताव ते कॅबिनेटच्या समोर ठेवण्याची शक्यता आहे.