वर्धा: पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला-बाहुलीचे लग्न; पहा फोटोज
पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात.
उन्हाने तापलेल्या आणि त्रासलेल्या महाराष्ट्राला आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील एका गावात पाऊस पडावा म्हणून चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न लागवण्यात आले. राज्यात विदर्भात दुष्काळ असून वर्धा जिल्हा या त्यापैकी एक आहे.
विधीवत आणि परंपरेने पार पडललेल्या या लग्नसोहळ्याचे काही फोटोज एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहेत.
ANI ट्विट:
या लग्नाबद्दल गावकरी म्हणतात की, "दुष्काळामुळे गावातील 22 मुलगे आणि 2 लग्नाळू मुलींची लग्न होत नसल्याने आम्ही बाहुला-बाहुलीचे लग्न करण्याचे ठरवले."
महाराष्ट्रातील कोकणात मान्सूनने हजेरी लावली असून येत्या 24 तासांत मान्सून राज्याच्या काही भागात सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.