Maharashtra Karnataka Dispute: भारताचा प्रत्येक नागरिक त्याला हवं तेव्हा आणि हवं तिथे जावू शकतो, मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया
तरी चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाईंच्या दौऱ्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्या बेळगाव दौऱ्यावरुन महाराष्ट्र कर्नाटक सिमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. री कर्नाटकाचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात न येण्याचा ईशारा दिला आहे. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले महाराष्ट्राचे नेते बेळगावात आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बेळगावात येण्याची योग्य वेळ नाही असं वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सिमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) खटला अजुनही न्यायालयात सुरु आहे, तो कायदेशीररीत्या लढावा असा सल्ला बोम्मई यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तरी मंत्री शंभूराजे देसाई यांनी बेळगाव (Belgaum) दौरा रद्द केलेला नाही. पण या दौऱ्यासंबंधीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) निर्णय घेतील. तरी देवेंद्र फडणवीसांनी यावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सिमावादावर महाराष्ट्र किंवा कर्नाटक निर्णय घेऊ शकत नाही. हा संपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाचा जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल पण भारत हा स्वतंत्र्य देश आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिक त्याला हवं तेव्हा आणि हवं तिथे जावू शकतो. तरी चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाईंच्या दौऱ्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. (हे ही वाचा:-)
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र (Karnataka Maharashtra Border Dispute) राज्यात असलेली परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सध्या बेळगावला (Belgaum) भेट देऊ नये असं वक्तव्य कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. तरी दोन्ही राज्यातील राजकारण्यांच्या शाब्दिक वादानंतर सिमावाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.