Kalyan Crime News: लव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणखी एका तरुणीचा बळी, कल्याण हादरलं
कल्याणमध्ये पुन्हा एकदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणीचा बळी गेला आहे.प्रियकराने प्रेयसीची राहत्या घरी हत्या केली.
Kalyan Crime News: श्रध्दा वालकरच्या हत्येने मुंबईत मोठी खलबळ उडाली होती. कल्याणमध्ये पुन्हा एकदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणीचा बळी गेला आहे. दिवसेदिवस या घटना वाढत चालल्या आहे. कल्याणमधील या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीची चाकूने हल्ला करत तीचा खून केला आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केली आहे. असा अंदाज व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण मध्ये प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर चाकूने वार करत तीची हत्या केली आहे. या घटनेत तीचा जागीच मृत्यू झाला. कल्याण पूर्व विजय नगर येथील आमराई परिसरात ही घटना घडली आहे. रसिका कोळबेकर आणि विजय जाधव हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली तेव्हा चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती मिळाली.
दोघांमध्ये अनेक वेळा भांडण झाले. आणि रागाच्या भरात विजयने रसिकाचा खून केला. या घटनेमुळे कल्याण शहर हादरले आहे. रसिकाचा राहत्या घरीच हत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि या घटनेअंतर्गत पोलीस संपुर्ण तपास करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 02:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

