Maharashtra HSC Results 2020 Date: 12वी निकाल 15 जुलै पर्यंत लागण्याची शक्यता; mahresult.nic.in वर असे पाहू शकाल मार्क्स!
दरम्यान हा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पाहू शकतात.
Maharashtra Board 12th Results Date: फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. आता उच्च शिक्षणासाठी तयारी करत असलेल्या अनेकांना त्यांच्या HSC बोर्डाच्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ABP Majha ला दिलेल्या माहितीमध्ये यंदा महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल 15 जुलै पर्यंत लागण्यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी आणि पदवीच्या अभ्यासक्रमासाठी देशा-परदेशात शिक्षणाचे पर्याय शोधू पाहणार्यांना येत्या काही दिवसातच बारावी निकालाची यंदाची तारीख (12th Results Date) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये बोर्ड परीक्षांच्या अनेक तारखांबाबतचे फेक मेसेज फिरत असल्याची माहिती समोर आली होती. परंतू अद्याप शिक्षण मंडळाकडून तारीख ठरवण्यात आलेली नाही. त्यामुळे खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन मंडळाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतात. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमधून उपलब्ध करून दिली जाते. Maharashtra Board Exam Results 2020: 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?
बोर्डाचा 12वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
दरम्यान यंदा बारावीला 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी सामोरे गेले आहे. दरम्यान त्यांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात सुरळीत पार पडली आहे. मात्र त्यानंतर राज्यभरात कोरोना व्हायरसच्या दहशतीला सुरूवात झाल्याने पेपर तपासणीचं काम रेंगाळलं आहे. राज्यात झपाट्याने फैलाव झालेल्या कोरोना व्हायरसने हॉटस्पॉट बनवलेल्या अनेक कंटेन्मेंट झोनमध्ये पेपर तपासणीच्या कामासाठी शिक्षकांना, मॉडरेटर्सना बाहेर पडता आले नाही. मात्र लॉकडाऊनमध्येही काही प्रमाणात त्यांच्यासाठी संचारबंदीचे नियम शिथिल करून आता नऊही विभागातून निकाल लावण्याचं काम वेगाने सुरू आहे. यंदा 12वीचे निकाल 650 ऐवजी 600 मार्कांच्या आधारे लावण्यात येणार आहे.