Maharashtra Gram Panchayat Election 2020: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात 30 ग्रामपंचायती बिनविरोध; आमरादर निलेश लंके यांची आयडिया प्रभावी
या निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी 2021 ला मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहेत.
Maharashtra Gram Panchayat Election 2020: ग्रामपंचायत निवडणुकीत (Maharashtra Gram Panchayat Election) होणारा खर्च, संघर्ष आणि गावगाड्याचा होणारा विचका टाळण्यासाठी राज्य सरकार आणि राजकीय नेतृत्वं पुढे आली आहेत. त्यातून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध (Gram Panchayats Uncontested Election) करण्याचे अवाहन करण्यात येत आहे. या अवाहनाला अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यातील पारनेर (Parner Taluka तालुक्यातील 30 गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांची आयडीया येथे कामी आल्याची चर्चा आहे. आमदार निलेश लंके यांनी घोषणा केली होती की, ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि 25 लाख रुपये घेऊन जा. या अवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील सुमारे 30 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील आणखीही 10 ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीनेही प्रतिसाद दिला आहे. राळेगणसिद्धी ग्रामपंचायतही बिनविरोध होणार आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. राळेगणसिद्धी गावातही दोन गट आहेत. परंतू, या दोन्ही गटांनी एकेक पाऊल मागे घेत बिनविरोधचा मार्ग निवडला. आमदार लंके यांनी फेसबुकद्वारे अवाहन केले होते की, गावकऱ्यांनी ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात. (हेही वाचा, Gram Panchayat Elections 2021: सोलापूर जिल्ह्यात सरपंच पद आरक्षण सोडतीस ब्रेक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश)
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14, 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडत आहेत. या निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी 2021 ला मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम 2021
- निवडणूक अर्ज स्विकृती- 20 ते 30 डिसेंबर 2020 (सुट्टीचे दिवस वगळून)
- निवडणूक अर्ज छाननी- 31 डिसेंबर 2020
- अर्ज मागे घेण्याची मुदत- 4 जानेवारी 2021 अखेर
- चिन्ह वाटप- 4 जानेवारी 2021
- मतदान - 15 जानेवारी 2021 (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)
- मतमोजणी- 18 जानेवारी 2021
- गडचिरोली जिल्हा मततान वेळ- सकाळी7.30 ते दुपारी 3.00
निवणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या (जिल्हानिहाय)
- ठाणे- 158
- पालघर- 3
- रायगड- 88
- रत्नागिरी- 479
- सिंधुदुर्ग- 70
- नाशिक- 621
- धुळे- 218
- जळगाव- 783
- अहमनगर- 767
- नंदुरबार- 87
- पुणे- 748
- सोलापूर- 658
- सातारा- 879
- सांगली- 152
- कोल्हापूर- 433
- औरंगाबाद- 618
- बीड- 129
- नांदेड- 1015
- उस्मानाबाद- 428
- परभणी- 566
- जालना- 475
- लातूर- 408
- हिंगोली
अनेक ग्रामपंचायतींची मुदत 2020 मध्येच संपली आहे. परंतू, जगभरात आलेल्या कोरोना व्हायरस संकटामुळे राज्य आणि देशभरातील सर्व निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता कोरोनाचे संकट काहीसे निवळले आहे. त्यामुळे आता या निवडणुका मोठ्या प्रमाणावर पार पडताना दिसत आहेत.