Maharashtra Government Formation: व्हीप म्हणजे नक्की काय? व्हीप काढण्याचा कोणाला असतो अधिकार?
पण हा व्हीप म्हणजे नक्की काय? आणि हा व्हीप नक्की कसा काढला जातो हे आज आपण पाहणार आहोत.
WHIP To Decide New Maharashtra Government: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसला तरी आज आणि उद्या मध्ये राजकीय हालचालींइन वेग येताना दिसेल आणि उद्या संध्याकाळपर्यंत स्थिर सरकार स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजपने अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करून शपथविधी देखील पार पडला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता नक्की कोण हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीचा गटनेता कोण यावरच कोणाचा सरकार येणार हे निश्चित होणार आहे. याचाच अर्थ हा घटनेतच किंग मेकर असले असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे गटनेता जो व्हीप काढेल तोच अंतिम मानला जातो आणि त्यावरून सर्व निर्णय घेतले जातील. पण हा व्हीप म्हणजे नक्की काय? आणि हा व्हीप नक्की कसा काढला जातो हे आज आपण पाहणार आहोत.
व्हीप चा अर्थ
व्हीप या शब्दाचा अर्थ आहे त्या पक्षाचा आदेश. पक्षातील कोणताही कार्यकर्ता वैयक्तिक निर्णय न घेता पक्षाची जी विचारसरणी आहे त्याला अनुसरून हा व्हीप तयार करण्यात येतो. थोडक्यात बघायचं झालं तर पक्षातील सर्व मंडळींनी काय निर्णय घ्यावा याचा आदेश म्हणजे व्हीप.
व्हीप कसा काढला जातो?
प्रत्येक राजकीय पक्ष आपला विधिमंडळ गटनेता निवडतो. आणि त्यालाच व्हीप काढण्याचा अधिकार दिलेला असतो. पण व्हीपचा न आदेश पाळल्यास, मोठ्या संख्येने आमदार अपात्र ठरतात.
या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परंतु नवीन कायद्यानुसार आता दोन तृतीयांशपेक्षा कमी आमदारांनी पक्षातून वेगळं व्हायचा निर्णय घेऊन नवा पक्ष स्थापन केला, अथवा दुसऱ्या पक्षात गेल्यास त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते.