Maharashtra Cabinet Portfolio Allocation: खातेवाटप जाहीर! अजित पवार अर्थमंत्री, अनिल देशमुख गृहमंत्री तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन खात्याची जबाबदारी; पहा संपूर्ण यादी

महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप आज, 5 जानेवारी रोजी अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे गृह, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे महसूल, आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप आज, 5 जानेवारी रोजी अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले आहे.  शिवसेना (Shivsena) , काँग्रेस (Congress)  आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या नेत्यांनी बैठक घेऊन तयार केलेल्या प्रस्तावित खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatisingh Koshyari) यांची स्वाक्षरी मिळाल्यावर याबाबत राजभवनातुन अधिकृत घोषणा करण्यात आली. खातेवाटपात अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे गृह,  बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे महसूल, आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, काल राजीनामा नाट्यामुळे चर्चच्या आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य खाते सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांनी स्वतःकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, खाती घेतली आहेत. या खातेवाटपाची मंत्री निहाय संपूर्ण यादी जाणून घेऊयात...

कॅबिनेट मंत्री

1. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,

सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

2.उप मुख्यमंत्री अजित अनंतराव पवार,

वित्त, नियोजन

3. सुभाष राजाराम देसाई

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

4. अशोक शंकरराव चव्हाण

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

5. छगन चंद्रकांत भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

6. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील

कामगार, राज्य उत्पादन शुल्क

7.जयंत राजाराम पाटील

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

9. अनिल वसंतराव देशमुख

गृह

10. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

महसूल

11.राजेंद्र भास्करराव शिंगणे

अन्न व औषध प्रशासन

12. राजेश अंकुशराव टोपे

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13. हसन मियालाल मुश्रीफ

ग्राम विकास

14. डॉ.नितीन काशिनाथ राऊत

उर्जा

15. वर्षा एकनाथ गायकवाड

शालेय शिक्षण

16. डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड

गृहनिर्माण

17. एकनाथ संभाजी शिंदे

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

18. सुनिल छत्रपाल केदार

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

19. विजय वडेट्टीवार

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20. अमित विलासराव देशमुख

वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21. उदय रविंद्र सामंत

उच्च व तंत्र शिक्षण

22. दादाजी दगडू भुसे

कृषि, माजी सैनिक कल्याण

23. संजय दुलिचंद राठोड

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

24. गुलाबराव रघुनाथ पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता

25. ॲड. के.सी. पाडवी

आदिवासी विकास

26. संदिपानराव आसाराम भुमरे

रोजगार हमी, फलोत्पादन

27. बाळासाहेब पांडुरंग पाटील

सहकार, पणन

28. ॲड. अनिल दत्तात्रय परब

परिवहन, संसदीय कार्य

29. अस्लम रमजान अली शेख

वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)

महिला व बालविकास

31. शंकराराव यशवंतराव गडाख

मृद व जलसंधारण

32. धनंजय पंडितराव मुंडे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

33.आदित्य उद्धव ठाकरे

पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

*राज्यमंत्री*

1. अब्दुल नबी सत्तार

महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील

गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3. शंभुराज शिवाजीराव देसाई

गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4. बच्चू बाबाराव कडू

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5. श्री दत्तात्रय विठोबा भरणे

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8.संजय बाबुराव बनसोडे

पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे

नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10.आदिती सुनिल तटकरे

उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

दरम्यान, यामध्ये मंत्रिमंडळ विस्त्रात तसेच खातेवाटपात अनेक नेत्यांनी आपल्याला दिलेल्या संधीवरून नाराजी व्यक्त केली आहे, या नाराजीचे पुढे बंडात रूपांतर होणार की या मंत्रिमंडळातून राज्याच्या हितासाठी खरोखरच उत्तम निर्णय घेतले जाणार हे आता पाहायचे आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now