Forest Department Transfer: भ्रष्टाचार थांबवा, वन अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन करा; वन परिक्षेत्र अधिकारी संघटनेची मागणी
वन खात्याने 31 मे 2023 रोजी 39 सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर 12 जणांना त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्याची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
वन विभागातील (Forest Department) वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजेच आर एफ ओ (RFO)च्या बदलीवरून वन विभागात वादंग माजला आहे. अनेक आमदारांनी वनविभागातील प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. मात्र महाराष्ट्रातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (RFO) महाराष्ट्रातील संघटनेने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर वन विभागातील इतर सर्व बदल्या ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात याव्या. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने कुठे बदली मागितली आहे. कोणत्या जागा रिक्त आहेत, हे सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिसाव्या अशी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
वन खात्याने 31 मे 2023 रोजी 39 सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर 12 जणांना त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्याची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयात होत आहे. सहाय्यक वनसंरक्षकांच्या बदल्यांची फाईलसुद्धा वनमंत्र्यांनी मागवली आहे. राज्यात सुमारे 200 पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाले आहेत.
सध्या वनमंत्र्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार प्रशासनाकडे दिले असले तरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या संघटनेने भविष्यात बदलीचे अधिकार प्रशासनाकडेच ठेवून त्या बदल्या अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार नव्हे, तर ऑनलाईन पद्धतीने कराव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2023 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

