Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery: राजश्री 1000 स्पेशल खरेदीचा आज शेवटचा दिवस, उद्या निकाल; पहा कुठे, कसा पहाल लॉटरीचा रिझल्ट
त्यासाठी ग्राहकांना राजश्री लॉटरीच्या bookmyrajshree.com अधिकृत वेबपेजला भेट द्यायची आहे.
Rajshree 1000 Special lottery Draw Date, Time: यंदा दिवाळीच्या धामधूमीत Diwali 2020 Bumper Lottery मध्ये राजश्री 1000 (Rajshree 1000 Special lottery) च्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हा लॉटरीचा निकाल ग्राहकांना ऑनलाईन 25 नोव्हेंबर दिवशी पहायला मिळणार आहे. दरम्यान ऑनलाईनच्या माध्यमातून तुकीट बुकिंगसाठी आज (24 नोव्हेंबर) दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच लोकांना सोडतीची तिकिटं विकत घेता येणार आहे. तर उद्या या राजश्री लॉटरीच्या तिकटाची सोडत जाहीर करून अंतिम निकालामध्ये एकुण 65,000,000 रूपयांची बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. यामध्ये पहिलं बक्षीस 2.5 कोटींचं आहे. 5 भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी 50 लाखाचं बक्षीस जिंकता येणार आहे.
राजश्री 1000 चा निकाल कसा कुठे पहाल?
दिवाळी निमित्त जाहीर केलेल्या या राजश्री 1000 लॉटरीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना राजश्री लॉटरीच्या bookmyrajshree.com अधिकृत वेबपेजला भेट द्यायची आहे. हा निकाल संध्याकाळी 8.30 वाजता जाहीर केला जाणार आहे. येथेच निकाल आणि विजेत्यांची यादी देखील पाहता येणार आहे. Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery Result: 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल lottery.maharashtra.gov.in वर जाहीर; इथे पहा विजेत्यांची यादी.
राजश्री 1000 स्पेशल बक्षीसांची रक्कम
दरम्यान राजश्री लॉटरी ही मिझोराम स्टेट लॉटरी आहे. तेथील राज्य सरकारकडून ती ऑर्गनाईज आणि प्रमोट केली जाते. काही दिवसांपूर्वी दिवाळी निमित्त डियर लॉटरी आणि महाराष्ट्र राज्य दिवाळी बंपर लॉटरीचे देखील निकाल जाहीर करण्यात आले आहेत.