Corona In Maharahstra: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार Red, Orange, Green झोन मध्ये महाराष्ट्र राज्याची विभागणी; तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो जाणून घ्या

कोरोना रुग्णसंख्येनुसार ही विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन (Red Zone), 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज (Orange Zone) आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन (Green Zone) मध्ये समाविष्ट होतील.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन (Lock Down In Maharashtra) वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. 14 एप्रिल नंतर काही भागात लॉक डाऊनचे नियम शिथिल तर काही भागात अधिक कठोर करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. हे भाग कोणते असतील हे वर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार ही विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन (Red Zone), 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज (Orange Zone)  आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन (Green Zone) मध्ये समाविष्ट होतील.  Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्राचा एकूण आकडा किती?

 तुम्ही राहत असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घ्या.

रेड झोन

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद

ऑरेंज झोन

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया

ग्रीन झोन

धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली

दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात कोणतेही नियम रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये शिथिल केले जाणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यात येऊ शकतात. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रात सद्य घडीला 1761 रुग्ण असून यापैकी 127 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेचज 1146 रुग्ण हे मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाणे, पुणे येथे जास्त रुग्ण आढळले आहेत. अन्य ठिकाणी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेण्यासाठी राज्यात 4641 सर्वेक्षण पथके रुजु करण्यात आली आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif