Maharashtra-Karnataka Border Row: कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Deputy CM Ajit Pawar यांचे पत्र

हा भाग सध्या कर्नाटकामध्ये आहे.या भागात मराठी भाषिक अधिक असल्याचा महाराष्ट्राचा दावा आहे.

Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Row) मार्गी लावण्यासाठी आता महाविकास आघाडी सरकारने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा म्हणून नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहले आहे. PTIच्या वृत्तानुसार, हे पत्र 9 ऑगस्ट 2021 चे आहे. यामध्ये अजित पवारांनी कर्नाटकामधील मराठी बांधवांवर कथित 'अत्याचारा' ला थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच विवादित भागाला महाराष्ट्रात सहभागी करून घेण्यास मदत करण्याचेही आवाहन केले आहे. 'कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'- CM Uddhav Thackeray.

महाराष्ट्राने बेळगाव, कारवार, निपाणी सह काही भागांवर दावा केला आहे. हा भाग सध्या कर्नाटकामध्ये आहे.या भागात मराठी भाषिक अधिक असल्याचा महाराष्ट्राचा दावा आहे. सध्या हा वाद न्यायालयात देखील अनेक वर्ष प्रलंबित आहे. अजित पवारांनी लिहलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आता 60 वर्ष झाली आहेत. पण अद्याप कर्नाटकातील मराठी भाषिक भाग बेळगाव, कारवार, बीदर आणि निपाणी सह अन्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट झाला नाही.

महाराष्ट्रात तसेच कर्नाटक मधील मराठी भाषिकांना अजूनही या गोष्टीचं वाईट वाटत आहे की सीमावाद अद्याप सुटला नाही. त्यामुळे पंतप्रधानांचे या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहले आहे. पवारांच्या मते सीमावादावर कायदेशीर लढाई सुरू आहे पण पंतप्रधानांनी सीमावाद लक्षात घेता त्यावर न्याय करावा.