Nanded Suicide: एका तरूणाचे विवाहित महिलेशी जुळले प्रेम; कुटुंबियांच्या विरोधामुळे दोघांची गळफास लावून आत्महत्या

ही घटना आज (22 मे) पहाटे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

नांदेड (Nanded) येथील हिमायतनगर (Himayatnagar) तालुक्यातील कामारवाडी येथील प्रेमी युगलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Couple Commits Suicide) केली आहे. ही घटना आज (22 मे) पहाटे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी (Himayatnagar Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच या दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर दोघांनाही कामारवाडी येथे एकाच चित्तेवर अग्नि देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील तरूणाचे एका विवाहित महिलेसह प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. यामुळे दोघांनीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, दत्ता आणि शारदा असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. दत्ता हा अवविवाहित आहे. परंतु, शारदा हिचे लग्न झाले असून गेल्या ती गेल्या चार वर्षांपासून तिच्या मामाकडे राहत होती. दरम्यान, दत्ता आणि शारदा यांचे प्रेम संबंध जुळले. या दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल त्यांच्या नातेवाईकाला कुणकुण लागली. परंतु, शारदा विवाहित असल्याने दत्ताच्या घरच्यांनी दोघांच्या प्रेम संबंधाला टोकाचा विरोध दर्शवला. तसेच दत्ताचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देण्याचे त्यांनी ठरवले. परंतु, यानंतर दोघांनाही ऐकमेकांपासून दूर व्हावे लागणार असल्याने दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानुसार, आज पहाटे गावा शेजारील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. हे देखील वाचा- Mumbai: 25 ऑक्सिजन सिलेंडर आणि 12 ऑक्सिजन किट्स जमा केल्याप्रकरणी एकाला अटक

याआधी अंबाजोगाई तालुक्याताली राजेवाडी येथे एका 24 वर्षाचा तरूण आणि 18 वर्षाच्या तरूणीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घटना बुधवारी (20 मे)  दुपारी उघडकीस आली होती. तसेच प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.