CM Uddhav Thackeray: सरकार पाडण्याचा मुहूर्त काढण्यात विरोधकांचे वर्ष गेले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जहरी टीका
या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विविध मुद्यांवर चर्चा केली आहे.
नुकतीच महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi) पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विविध मुद्यांवर चर्चा केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, राज्यातील जनतेमध्ये राज्य सरकारबद्दल कोणतेही दिसून येत नाही. मात्र, विरोधी पक्षामध्येच विरोधी हा शब्द आहे त्यामुळे त्यांना त्या शब्दाला जागावे लागते. तसेच विरोधकांचे मागचे वर्ष सरकार कधी पडेल? किंवा सरकार कधी पडणार? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामे केली त्याकडे त्यांचे लक्ष गेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले होते. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे, असे वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोलले की तुरुंगात टाकले जाते आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जाते आहे, असेही फडणवीस म्हणाले होते. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. हे देखील वाचा- Aurangabad Water Supply Scheme: राज्यातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे सीएम उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
ट्वीट-
तसेच मराठा आरक्षण देत असताना किंवा कोणतेही आरक्षण देत असताना कुणाचेही हक्क मारले जाणार नाही. कुणाचेही आरक्षण काढून कुणालाही दिले जाणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न येईल तेव्हा त्यांचे हक्क कुणीही हिरावून घेणार नाही. हा काहीही कारण नसताना उगाचच विरोधकांनी मुद्दा केला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरोना संकट असेल, निसर्ग वादळ असेल, अवकाळी पाऊस अशी अनेक संकटं राज्यावर आली तरीही त्यातून हे सरकार मार्ग काढते आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.