MD/MS Examinations 2020 वर्ष अखेरीपर्यंत लांबणीवर टाकण्यासाठी CM उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया (Medical Council of India)च्या MD/MS Examinations यंदा वर्ष अखेरीपर्यंत पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे.

Uddhav Thackeray, Pandit Nehru | | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया (Medical Council of India)च्या MD/MS Examinations यंदा वर्ष अखेरीपर्यंत पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे. दरम्यान सध्या कोरोना संकट काळात फायनल इयर रेसिडंट डॉक्टर्स हे आघाडीवर राहून काम करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्यावर परीक्षांचं ओझं नको अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

दरम्यान Board of Governors of MCI च्या 18 जूनच्या पत्रकानुसार, विद्यापीठांना 30 जून पर्यंत परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ (MUHS) 15 जुलै पासून परीक्षा घेण्याच्या तयारीमध्ये होते.

CMO Maharashtra Tweet  

सध्या अंतिम वर्षाचे अनेक रेसिडंट डॉक्टर्स जे एमडी, एमएसच्या परीक्षा देऊ इच्छितात ते सध्या खाजगी, पालिका रूग्णालयांमध्ये सध्या कोविड 19 च्या रूग्णांसाठी सेवा देत आहेत. अशावेळेस जर त्यांना परीक्षा देण्यासाठी मुभा दिली तर आरोग्य यंत्रणेवरचा भार अधिक वाढेल. अपुर्‍या डॉक्टर संख्येमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे पंतप्रधानांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून MCI ला MD/MS examinations डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलाव्यात तर super speciality च्या प्रवेश परीक्षादेखील लांबणीवर टाकाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.

सध्या देशभरात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. काल रात्री आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 24 तासांत राज्यात 3,890 नवे रूग्ण तर 208 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1,42,900 च्या पार तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 6739 इतकी झाली आहे.