IPL Auction 2025 Live

Uddhav Thackeray Live Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता येणार लाईव्ह; कंगना की कोरोना नेमकं कशावर बोलणार?

दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे लाईव्ह येणार असल्याचे समजतेय.

CM Uddhav Thackeray (PC - Twitter)

मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  आज मोठ्या अवधीनंंतर पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातुन राज्यातील जनतेशी संंवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे लाईव्ह येणार असल्याचे समजतेय. मागील काही काळात महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत. कोरोना चा वाढता धोका (Coronavirus In Maharashtra) , विदर्भातील पुर परिस्थिती (Vidarbha Flood) , कंंगना रनौत विरुद्ध शिवसेना प्रकरण (Kangana Vs Shivsena), सुशांंत सिंंह राजपुत मृत्यु, रिया चक्रवर्ती (Rhea Chakrobarty) हिची अटक, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी मधील नेत्यांंना आलेले धमकीचे कॉल, नुकतंंच पार पडलेलंं महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन या सर्व बाबी चर्चेत असताना मुख्यमंंत्री नेमक्या कोणत्या विषयावर भाष्य करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Retired Navy Officer Beaten in Maharashtra: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया - संजय राऊत

मागील काही दिवसातील परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांंना विविध माध्यमातुन टार्गेट केले जात आहे, अभिनेत्री कंंगना रनौत हिने तर उद्धव ठाकरे यांंच्यावर आरोपांंचा नुसरा माराच सुरु केला आहे, तर मुख्यमंंत्र्यांंचा एकेरी उल्लेख हे प्रकरण सुद्धा बरेच वादग्रस्त ठरले आहे. अलिकडेच भारतीय नौदलातील निवृत्त अधिकार्‍याला शिवसैनिकांंनी केलेली मारहाण यावरुन काही स्पष्टीकरण ठाकरे देणार का हे ही पाहायचे आहे.

Maharashtra Hotels, Resorts, Home Stays Guidelines: महाराष्ट्रामध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टेबाबत मार्गदर्शक सूचना जारी; पहा यादी

दरम्यान, यावेळी महाराष्ट्रात कोरोना संंदर्भात काही नव्या उपाययोजना केल्या जाणार का? दिवाळीनंंतर शाळा सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे का? देशातील मेट्रो सेवा सुरु झाल्या असताना मुंंबई मेट्रोबाबत काही निर्णय होणार का? याबाबत उत्तर मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांंचे लाईव्ह संंबोधन फेसबुक तसेच ट्विटरच्या माध्यमातुन आपण पाहु शकता. तसेच संपुर्ण अपडेट साठी लेटेस्टली मराठी चे पेज सुद्धा पाहत राहा.