Maharashtra SSC & HSC Repeater Exams Result 2020: १० वी, १२ वी च्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असे पहा तुमचे गुण
Maharashtra SSC, HSC Supplementary Examination Result 2020: दहावी, बारावी च्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर असे पहा तुमचे गुण.
Maharashtra SSC, HSC Supplementary Examination Result 2020: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावी च्या फेरपरीक्षेचा निकाल आज (बुधवार, 23 डिसेंबर) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षार्थी निकाल पाहू शकतात. mahresult.nic.in या संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहून गुणपत्रिका डाऊनलोड करु शकता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दहावीच्या (१० वी) परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर बारावीच्या (१२ वी) परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत पार पडल्या होत्या. (FYJC Admissions 2020 Special Round Schedule: 11 वी प्रवेश प्रकियेसाठी आजपासून विशेष फेरीचं आयोजन; इथे पहा वेळापत्रक)
SSC आणि HSC फेरपरीक्षांचे गुण कसे पाहाल?
परीक्षार्थी खालील स्टेप्स फॉलो करुन संकेतस्थळावर आपले गुण पाहू शकतात.
# महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
# होमपेजवरील "SSC Examination Result November 2020" किंवा "HSC Examination Result November 2020" लिंकवर क्लिक करा.
# ही लिंक तुम्हाला निकालाच्या पेजवर डिरेक्ट करेल.
# तेथे तुमचा रोल नंबर, जन्मतारीख भरुन लॉग इन करा.
# तुमचा निकाल स्क्रीनवर झळकेल.
# निकाल डाऊनलोड करा. तसंच तुम्ही निकालाची प्रिंटही घेऊ शकता.
यंदा दहावीचा निकाल 29 जुलै तर बारावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला होता. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. यावेळेस बारावीचे सर्व पेपर्स सुरळीत पार पडले होते. तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 15.69 लाख विद्यार्थी बसले होते. तर साधारण तितकेच विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान बोर्डाने 20 नोव्हेंबरपासून रिपीटर परीक्षा किंवा पुरवणी परीक्षा आयोजित केल्या होत्या. आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे.