Maharashtra Board 12th Result 2020: बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर; mahresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स!
mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, maharashtraeducation.com वेबसाईट्स पहा निकाल.
Maharashtra Board HSC Result 2020: महाराष्ट्रात फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये पार पडलेल्या 12वी परीक्षांचा निकाल (HSC Results) आज जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात यंदा बारावीचा निकाल 90.66 % लागला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण 1 वाजल्यापासून शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहेत. त्यासाठी mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, maharashtraeducation.com वेबसाईट्स खुल्या करण्यात आल्या आहेत. आज विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन स्वरूपात निकाल पाहता येईल. त्यानंतर काही दिवसांनी गुणपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील. तर उद्यापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपी पाहण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. Maharashtra Board HSC Result 2020: बारावीचा निकाल 90.66 %, कोकण विभागाने मारली बाजी.
12वीच्या निकालाबद्दल समाधानी नसलेल्यांना 17 जुलै पासून 27 जुलै पर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासोबतच उत्तर पत्रिकांची छायाप्रत पाहण्यासाठी 5 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुभा आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी verification.mh-hsc.ac.in वर अर्ज करू शकतात. Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?
विज्ञान, कला, वाणिज्य शाखेचे 12वीचे विद्यार्थी कसा पाहू शकतील त्यांचा ऑनलाईन निकाल?
- mahresult.nic.in वर किंवा बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईट सुरु करा.
- अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर HSC Results चा पर्याय दिसेल.
- तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
दरम्यान यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल 28 मे 2019 दिवशी लागला होता. यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान सारे पेपर सुरळीत पार पडले आहेत.