Maharashtra Board 10th Result 2019 Date: 10 जूनच्या आधी महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल लागण्याची शक्यता, mahresult.nic.in या वेबसाईटवर लागणार निकाल

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या 6 जूनला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

दहावी, बारावीच्या विविध बोर्डांच्या निकालाची मालिका सुरु असतानाच आता सर्वांचे लक्ष लागलय ते महाराष्ट्र बोर्डच्या दहावीच्या निकालांचे (Maharashtra SSC Result 2019). लोकसभा निवडणूक 2019 मुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल उशिरा लागतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ह्या निवडणुकीचा निकालांवर कोणताही परिणाम न होता अपेक्षित तारखेप्रमाणे सर्व परीक्षांचे निकाल लागले. त्यानुसार महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या 6 जूनला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर चेक करु शकता. तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र बोर्डाकडून इतर तीन वेबसाईट्सवर देखील निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट्स:

exametc.com

examresults.net

indiaresults.com

राज्यात यंदा 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 4 हजार 874 परीक्षा केंद्रांवर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा पार पडली.

Maharashtra Board HSC Results 2019: 12 वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर, 10 वी लवकरच; अ‍ॅडमिशन साठी आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

तर मागील वर्षी राज्यात एकूण 17, 51,353 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 15, 65, 884 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षाची राज्याची एकूण टक्केवारी 89.41% इतकी होती. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 8 जून 2018 रोजी लागला होता. मात्र यंदा हा निकाल 8 जून च्या आधीच लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif