Maharashtra Bank Holidays List 2023: पुढील वर्षी महाराष्ट्रात 24 दिवस बँका राहणार बंद; सरकारने जाहीर केली सुट्ट्यांची यादी (See List)

याशिवाय राज्यातील सर्व बँका आणि सरकारी कार्यालये राष्ट्रीय सण आणि उत्सवांच्या काळात बंद असतात.

Maharashtra Bank Holidays List 2023 (Photo Credit : Pixabay)

महाराष्ट्रामध्ये येत्या नवीन वर्षात 24 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. सन 2023 मध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहतील आणि कोणत्या सार्वजनिक सुट्ट्या असतील याची माहिती देणारी यादी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. 1881 च्या कायद्यांतर्गत, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या नियंत्रणाखालील बँकांसाठी सुट्टीची यादी जारी करतात.

भारतातील बँका आणि सरकारी कार्यालयांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. याशिवाय राज्यातील सर्व बँका आणि सरकारी कार्यालये राष्ट्रीय सण आणि उत्सवांच्या काळात बंद असतात. नवीन वर्ष म्हणजे 2023 साठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या बँकिंग सुट्ट्यांच्या यादीत रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार व्यतिरिक्त सुमारे 24 दिवस समाविष्ट करण्यात आले आहेत. (हेही वाचा: सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधी ठराव विधानसभेत एकमताने मंजूर; बेळगाव, निपाणी सह 865 गावांचा महाराष्ट्रात सहभाग)

जानेवारी 2023

26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2023

18 फेब्रुवारी– महाशिवरात्री

19 फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)

मार्च 2023

7 मार्च– होळी

22 मार्च– गुढीपाडवा

30 मार्च- रामनवमी

एप्रिल 2023

4 एप्रिल- महावीर जयंती

7 एप्रिल- गुड फ्रायडे

14 एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

22 एप्रिल- रमझान ईद

मे 2023

1 मे- महाराष्ट्र दिन

5 मे- बुद्ध पौर्णिमा

जून 2023

28 जून- बकरी ईद

जुलै 2023

29 जुलै- मोहरम

ऑगस्ट 2023

15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट- पारशी नववर्ष

सप्टेंबर 2023

19 सप्टेंबर- गणेश चतुर्थी

ऑक्टोबर 2023

2 ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती

24 ऑक्टोबर- दसरा

नोव्हेंबर 2023

12 नोव्हेंबर- लक्ष्मी पूजन

14 नोव्हेंबर- दिवाळी पाडवा

27 नोव्हेंबर- गुरुनानक जयंती

डिसेंबर 2023

25 डिसेंबर- नाताळ

या सुट्यांमध्ये बँकांचे ऑनलाइन व्यवहार सुरू राहतील.