'डूब.. डूब के मरो'; कलम 370 मुद्यावरुन अकोला येथील सभेत पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांना टोला
या भ्रष्टवादी युतीनेच महाराष्ट्राचं नुकसान केलं. सिंचन घोटाळाही या भ्रष्टवादी सरकारच्या काळातच झाला. केवळ मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याचा आरोप मोदींनी केला. कलम 370 वर जोर देत जीवाची बाजी लावेल परंतू, देशहिताचे रक्षण करेन असा पुनरुच्चारही मोदींनी या वेळी केला.
Maharashtra Assembly Elections 2019: जम्मू काश्मीर मधील कलम 370 (Article 370) चा महाराष्ट्र निवडणूकीत काय संबंध? असा प्रश्न विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) सरकारला केला होता. विरोधकांच्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अकोला (Akola) येथील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. आज महाराष्ट्रातील एकही भाग नसेल जिथून भारतमातेच्या रक्षणासाठी जवान जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाला नसेल. त्यामुळे जनतेला कलम 370 चे महत्त्व माहिती आहे. परंतू, विरोधकांना देशात दुफळी हवी आहे. आम्ही तसे होऊ देणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कलम 370 चा नारा दिला. भाजप-शिवसेना युती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बुधवारी (16 ऑक्टोबर 2019) बोलत होते.
या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. संपूर्ण देश कलम 370 च्या मुद्द्यावरुन सरकारच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची भ्रष्टवादी युती आहे. या भ्रष्टवादी युतीनेच महाराष्ट्राचं नुकसान केलं. सिंचन घोटाळाही या भ्रष्टवादी सरकारच्या काळातच झाला. केवळ मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याचा आरोप मोदींनी केला. कलम 370 वर जोर देत जीवाची बाजी लावेल परंतू, देशहिताचे रक्षण करेन असा पुनरुच्चारही मोदींनी या वेळी केल. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौर्यावर; पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मध्ये घेणार प्रचारसभा)
एएनआय ट्विट
एएनआय ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे जोरादर कौतुक केले. या आधीच्या आघाडी सरकारमध्येही पॅकेज जाहीर होत असत. परंतू, ही पॅकेज काही लोकांच्याच खिशात जात असत. देवेंद्र फडणवीस सरकारने ही पॅकेज जनतेपर्यंत पोहोचवली. इतकेच नव्हे तर, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वीज, शेती, जलव्यवस्थापण, अशा अनेक मुद्दयांवर फडणवीस सरकार यशस्वी झाल्याचे कौतुगोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.