शरद पवारांवर ED ची कारवाई आणि अमित शाह यांचे व्यक्तिगत हल्ले BJP ला पडले भारी?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रचाराच्या जोरावर एकट्या राष्ट्रवादीने आजवर 51 जागांवर आघाडी मिळवली आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना जनतेने नाकारले.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचा दाणून पराभव झाला आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असेलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी 30, 768 मतांनी पंकजाचा पराभव केला. धनंजय मुंडेंना 1 लाख 21 हजार 186 मतं मिळाली, तर पंकजाला 90, 418 मतं मिळाली. काही झालेल्या विधानसभा मतदानानंतर आज झालेल्या सध्याच्या मतमोजणीनुसार भाजप-शिवसेनेच्या महायुतीला 158, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला 108 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजप (BJP)-सेनेची महायुती सत्ता स्थापन करणार हे कायम आहे पण, याचीही नोंद घेण्यासारखे आहे की राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षापेक्षा अधिक चांगले प्रदर्शन केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रचाराच्या जोरावर एकट्या राष्ट्रवादीने आजवर 51 जागांवर आघाडी मिळवली आहे. (सातारा मधील गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव म्हणत शरद पवार यांच्याकडून उदयनराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार हे संपूर्ण निवडणूक प्रचाराचा एकमेव चेहरा ठरले आहेत. एकीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पवारांवर त्यांच्या ईडी वरील चौकशीमुळे टीका करत होते, तर पवारांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि असा आपला या सर्व घोटाळ्यातून कोणताही संबंध नसल्याचा विश्वास मतदारांना करून दिला. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर अनेक टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी हे भ्रष्ट पक्ष आहे, त्या पक्षातून आलेले सर्व सदस्य आमच्या पक्षात (भाजप) येऊन शुद्ध झाले आहे. राष्ट्रवादीमध्ये घराणेशाहीचं वर्चस्व आहे. शिवाय पवारांच्या ईडी चौकशीचा मुद्दाही शाहांनी प्रचार सभेत उचलला होता. पण, निवडणुकीच्या सध्याच्या कौलानंतर भाजपला हेच सर्व भारी पडले असे दिसत आहे. पक्षांतर्गत झालेले बदल आणि अनेक नेत्याचं इनकमिंग भाजप पक्षाला महागात पडले. महाराष्ट्रात त्यांनी काय केले हे वारंवार विचारत, शहांनी एका प्रचारसभेत पवारांवर हल्ला बोल केला.
भाजप-सेनेच्या जागांच्या लढतीत राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला आहे. 2014 च्या 41 जागांच्या तुलनेत राष्ट्रवादीला 55 जागा मिळताना दिसत आहे. ते एकटे सत्ताधारी नेत्यांच्या प्रश्नांना समोर गेले.