महाराष्ट्रात मताचा कौल युतीला पण तरीही सत्ता स्थापनासाठी हे 3 पर्याय
एक्झीट पोलच्या दाव्यानुसार भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले.
Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. एक्झीट पोलच्या दाव्यानुसार भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये बहुमताचा आकडा 144 आहे. भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. अशातच शिवसेनेने भाजपच्या समोर आपल्या मागण्या ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र ताज्या अपडेट्सनुसार दोन्ही पक्षाला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणे सहज शक्य होऊ शकते. त्यामध्येच महाराष्ट्रात सकार बनवण्यासाठी तीन महत्वाचे पैलू समोर येत आहेत.
आतापर्यंत जनमाताचा कौल महाराष्ट्रात भाजपला 140 जागांकडे वळला आहे. शिवसेना 62 जागांवर आघाडी करत असल्याचे दिसून येत आहे. तर एनसीपी 51 आणि काँग्रे, 38 जागांवर पुढे चालत आहे. कौलनुसार शिवसेना आणि एनसीपीकडून करण्यात आलेल्या विधानांमुळे निवडणूकीचे निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी हे 3 पर्याय आहेत.
>>पहिला पर्याय हा भाजप-शिवसेना महायुतीबाबत आहे. या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही पक्षांना 165-170 जागांवर विजय मिळवता येईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या निकालामागील चित्र जेवढे साफ आहे तेवढेच त्यामागील सत्य अंधूक आहे.
>>काय आहे समस्या: शिवसेना महाराष्ट्राच्या राजकरणात आपण नेहमीच मोठ्या भावाची भुमिका पार पडली असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही शिवसेनेने आता भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी ही केली आहे. ही पहिलीच निवडणूक असून भाजप-शिवसेना एकत्र रिंगणात उतरले. विधानसभा निवडणूकीत भाजपला गेल्या निवडणूकीपैकी यावेळी कमी जागा मिळल्या आहेत.
>>शिवसेनेच्या धमकी नंतर भाजप दुसरा पर्यायाचा उपयोग करु शकतो. भाजप शिवसेनेला झटकारुन शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीची साथ मिळू शकते. एनसीपीला 50 पेक्षा अधिक जागा मिळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता भाजप सोबत हातमिळवणी केल्यास सत्ता सहजपणे स्थापन करता येणार आहे. 2014 मध्ये निवडणूक हरल्यानंतर विधानसभेत एनसीपीने बऱ्याच वेळा भाजपला साथ दिली होती.
>>महाराष्ट्रात शिवसेनेकडे सुद्धा सरकार बनवण्याचा पर्याय आहे. भाजप नंतर राज्यात हा दुसरा मोठा राजकरणातील पक्ष आहे. जर शिवसेना एनसीपी आणि काँग्रेसला सोबत आणल्यास यांच्याकडे 150 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात. शिवसेना एनसीपीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी 50-50 चा फॉर्म्युला वापरु शकतात.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: राजू पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी; मनसेचे खाते उघडले)
दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 164 जागा आणि शिवसेनेने 288 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी अमुक्रमे 147-124 जागांवर निवडणूक लढवली. मात्र आता उद्या निवडणूकीचे निकाल सष्ट होणार असून कोणाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.