Maharashtra Assembly Election Results 2019: नसीम खान, रमेश थोरात, यांच्यासहीत अवघ्या काही मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांची माहिती घ्या जाणून
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर झाला असून, राज्यातील काही मतदारसंघातील चुरशीच्या लढतीने राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्का दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर झाला असून, राज्यातील काही मतदारसंघातील चुरशीच्या लढतीने राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्का दिला आहे. दरम्यान सांगोला, कोपरगाव, चांदवली, अर्जूनी मोरगाव, दौंड या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. या मतदारसंघात शहाजी बापूराव पाटील, आशुतोष काळे, नसीन खान, मनोहर चंद्रिकापूरे, रमेश किशन थोरात यांच्या हाती यश आले आहे. त्याचबरोबर ही निवडणूक सर्व विजयी आमदारांसाठी अवस्मरणीय ठरली आहे. कारण, वरील सर्व उमेदवारांना या निवडणुकीत विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली असून,अवघ्या काहीच मतांनी त्यांचा विजय झाला आहे.
सांगोला मतदारसंघातील निकाल
1) शहाजीबापू राजाराम पाटील (शिवसेना) - 99464
2) डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख (शेकाप)- 98696
मतांचा फरक- 768
कोपरगाव मतदारसंघाचा निकाल-
1) आशुतोष अशोकराव काले (काँग्रेस) - 87566
2) स्नेहलता कोल्हे (भाजप)- 86744
मतांमधील फरक- 822
चांदवली मतदारसंघाचा निकाल-
1) नसीन खान (काँग्रेस)- 85470
2) दिलीप भाऊसाहेब- 85879
मतांमधील फरक- 409
अर्जूनी मोरगाव मतदारसंघाचा निकाल-
1) मनोहर चंद्रिकापूरे (काँग्रेस)- 72400
2) राजकुमार बडोले (भाजप)- 71682
मतांमधील फरक- 718
दौंड मतदारसंघाचा निकाल-
1) रमेश किसानराव थोरात (काँग्रेस)- 102918
2) राहुल सुभाषराव कूळ (भाजप)- 102763
मतांमधील फरक- 155
दरम्यान, सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपुष्ठात येणार आहे, त्यानुसार शपथविधी व सत्तास्थापनाचा कार्यक्रम पार पडेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)