आदित्य ठाकरे 11 हजार मतांनी आघाडीवर; राज्यात शिवसेना किंगमेकर ठरण्याची शक्यता

प्रसारमाध्यमांशी बोलताना एका प्रतिक्रियेत राज ठाकरे यांनी म्हटले होते की, माझ्या कुटुंबातला व्यक्ती निवडणुकीत पहिल्यांदाच उतरत आहे तर, मला वाटले नाही की तिथे उमेदवार द्यावा.

Aditya Thackeray, Abhijit Bichukale | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Worli Assembly Constituency Election Results 2019: अवघ्य राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. तर, त्यांच्या विरोधात उमेदवार असलेल्या अभिजित बिचुकले यांना अद्याप भोपळाही फोडता आला नाही. प्राथमिक फेरींचे कल हाती येत आहेत. पहिल्या फेरीदरम्यानच आदित्य ठाकरे यांनी तब्बल 11 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांचा विजय या मतदारसंघातून जवळपास नक्कीच समजला जात होता. प्राथमिक फेरीनंतर हा समज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यात शिवसेनेचे फायरब्रँड नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरल्यामुळे उत्सुकता ताणली होती. महत्त्वाचे असे की, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तगडा उमेदवार मैदानात नव्हता.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या राज ठाकरे यांनीही वरळी मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता. प्रसारमाध्यमांशी बोलताना एका प्रतिक्रियेत राज ठाकरे यांनी म्हटले होते की, माझ्या कुटुंबातला व्यक्ती निवडणुकीत पहिल्यांदाच उतरत आहे तर, मला वाटले नाही की तिथे उमेदवार द्यावा. (हेही वाचा, परळी: धनंजय मुंडे 1 हजार मतांनी आघाडीवर; भाजपसह पंकजा मुंडे यांना मोठा धक्का)

विशेष म्हणजे मुळचे सातारा येथील असलेले अभिजित बिचुकले हे थेट वरळी येथे दाखल झाले आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीची चर्चा महाराष्ट्रभर रंगली. पण धक्कादायक असे की, सुरुवातीच्या काही फेरीमध्ये अभिजित बिचुकले यांना एकही मत पडले नाही. त्यामुळे बिचुकले यांना भोपळाही फोडता आला नाही, असे चित्र आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif