IPL Auction 2025 Live

Maharashtra Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजप युती, ठरुन मोडण्याची शक्यता; विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून स्वबळाची चाचपणी

या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी दोन्ही पक्षाकडून आपापल्या पातळीवर चाचपणी सुरु असल्याचे वृत्त आहे.

Shiv Sena BJP Alliance | Image only representative purpose (Photo credit: File Image)

Maharashtra Assembly Election 2019: आमचं ठरलंय असं सांगता सांगता आमचं तुटलंय असं सांगण्याची वेळ शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP) या दोन्ही पक्षांव पुन्हा येते की काय, अशी स्थिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरुन सुरु असलेला ताण तणाव जागावाटपाच्या तिढ्यात अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी दोन्ही पक्षाकडून आपापल्या पातळीवर चाचपणी सुरु असल्याचे वृत्त आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळवार लढता येते का याबाबत चाचपणी करण्यासाठी संकेत महाराष्ट्रातील नेतृत्वास दिल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षातील एक गट सुरुवातीपासूनच स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. तर, दुसरा गट युतीबाबत आग्रही आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी भलेही युतीच्या आणाभाका घेतल्या. स्वत: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे शिवसेना आणि भाजपच्या वतीने युतीचा निर्णय वारंवार बोलून दाखवला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे एकत्र कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. मात्र, तहीरी दोन्ही पक्षांतील काही नेते युतीत बेबनाव निर्माण होईल अशी वक्तव्ये वारंवार केली जात आहेत.  (हेही वाचा, शिवसेना-भाजप युतीवर ठाम पण, संशय कायम; जे. पी. नड्डा यांच्या सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या)

आकडेवारी पाहून निर्णय

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 साठी केले जाणारे जागावाटप हे लोकसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर नव्हे तर, 2014 च्या फॉर्म्युल्यावर केले जावे असा भाजपतील एका गटाचा आग्रह आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकायची तर शिवसेना भाजप वेगवेगळे लढले होते. त्यात एकूण 288 जागांपैकी 220 जागांवर शिवसेना भाजप उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक 2019 साठी 50-50 फॉर्म्युला वापरायचा तर भाजपच्या वाट्याला फक्त 18 ते 20 जागाच अधिक येऊ शकतात. कारण, महाराष्ट्रात एकूण भाजप आमदारांची संख्या आहे 122 तर शिवसेना आमदार आहेत 63 .

2014 मध्ये भाजप उमेदवार साधारण 18 ते 20 जागांवर आघाडीवर (दुसऱ्या क्रमांकाची मते) होते. तर, काही मतदारसंघात भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे युती करुन लढण्यापेक्षा स्वबळावर लढलेले अधिक फायद्याचे ठरेल, असा भाजप पक्षश्रेष्टींचा विचार असल्याचे वृत्त आहे. आता शिवसेना आणि भाजप नेतृत्व युतीबाबत अखेरच्या क्षणी काय निर्णय घेतातय याबाबत उत्सुकता आहे.