महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुढील 3 दिवसात उस्मानाबाद,कोल्हापूर,ठाणे सह या 6 ठिकाणी घेणार जाहीर सभा
यात त्यांनी राष्ट्रावादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढील सभेची यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2019) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने (National Congress Party) त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी राष्ट्रावादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढील सभेची यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवार महाराष्ट्रातील (Maharashtra) कोणकोणत्या मतदार संघात सभा घेणार आहेत, याची माहीती देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांनी गेल्या महिन्यात अनेक सभा घेतल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या समर्थकांनी शरद पवार यांच्या सभेला मोठी उपस्थिती दाखवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार असून निकाल 24 ऑक्टोबर राजी लागणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष जोरदार प्रदर्शन सादर करत आहेत. या दरम्यान राष्ट्रवादीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शरद पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा आजपासून सुरू होत आहे, अशी पोस्ट करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील कोणकोणत्या मतदारसंघात शरद पवार सभा घेणार असल्याचे संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले आहे. हे देखील वाचा- अहमदनगर: नेवासा विधानसभा मतदारसंघात मच्छिंद्र मुंगसे यांना उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे घेवून येणे पडले महागात; 5 हजारांचा दंड
शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा पुढील प्रमाणे-
-मंगळवारी 1 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान भूम, उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत.
-गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान शरद पवार मुंब्रा, ठाणे येथे जाहीर सभा पार पडणार आहे. तसेच दुपारी 3 ते 4 दरम्यान जुन्नर, पुणे येथे शरद पवार यांची सभा होणार आहे.
-शुक्रवारी 4 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान शरद पवार बिद्री, राधानगरी, कोल्हापूर या ठिकाणी असणार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या हाती अपयश आले होते. एवढेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांनी राष्ट्रवादीचा पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.