Maharashtra Assembly Election 2019: निवडणूक आयोगाकडून 'एक्सिट पोल' वर बंदी; वाचा सविस्तर

परंत निवडणुकांआधीच भारतीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाचा व मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Exit Polls Representative Image (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. परंत निवडणुकांआधीच भारतीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाचा व मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी ६.30 वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांचे कल (एक्झिट पोल) दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या संदर्भातील ट्विट निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूक 2019: मराठवाडा कोणाचा? शिवसेना-भाजप युती गड राखणार की, काँग्रेस रष्ट्रवादी पुन्हा एकदा भाकरी फिरवणार?

तसेच कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार मतदान होण्याच्या एक दिवसापूर्वीपासून म्हणजेच 20 आणि 21 ऑक्टोबर या काळात प्रिंट मिडियामध्ये कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मीडिया प्रमाणपत्र आणि देखरेख समितीकडून सामग्रीचे पूर्व प्रमाणपत्र घेतल्याशिवाय प्रसिद्ध करू शकत नाही , असेही त्यांनी ट्विट केले आहे.

महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीसह आसम, बिहार, अरुणाचल प्रदेश, छत्‍तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्‍यप्रदेश, केरळ, मेघालय, ओदिशा, पंजाब, राजस्‍थान, पुद्दुचेरी, सिक्कि‍म, तेलंगणा, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश या 17 राज्यांधील 52 विधानसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक 21 ऑक्टोबर रोजीच होणार आहेत. आणि या सर्व निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif