Maharashtra Assembly BJP Candidate List: भाजपाची तिसरी उमेदवार यादी जाहीर; राम सातपुते, भारती लव्हेकर यांच्यासह 25 जणांच्या नावाचा समावेश, मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत?
या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपा कडूनही यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) आता रंगायला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असताना आज भाजपाने (BJP) 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राम सातपुते (Ram Satpute) , भारती लव्हेकर, किशोर जोरगेवार यांंच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान राम सातपुते हे लोकसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाले होते. पण भाजपाने आता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत माळशिरज मधून उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या दोन यादीमध्ये नाव नसल्याने नाराज अनेकांचा या यादीमध्ये समावेश आहे. यापैकी काहींनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान आता भाजपाने एकूण 146 उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपा मधून मुंबईतील बोरिवली मतदारसंघात संजय उपाध्याय यांना तिकीट दिले आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख च्या विरूद्ध भाजपाने चरणसिंह ठाकूर यांना तिकीट दिलं आहे. तर सावनेर मध्ये सुनील केदारांच्या पत्नी विरूद्ध भाजपनं आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. आर्वी मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांना तिकीट दिले आहे. वर्सोवामध्ये भारती लव्हेकरांना तिकीट मिळाले आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनाही तिकीट जाहीर झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर नाराज होते पण त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत भाजपाने त्यांना तिकीट जाहीर केले आहे. BJP Second List Of Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
मोर्शी मध्ये मैत्रीपूर्ण लढत?
मोर्शी विधानसभा मतदारसंघात या निवडणूकीतील एक रोमांचक लढत बघायला मिळणार आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपा कडूनही यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.दरम्यान महाराष्ट्राची विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.