BJP Second List Of Candidates: भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवरांची दुसरी यादी (BJP Second List Of Candidates) जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपने एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत नाशिक मध्य मधून देवयानी फरांडे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, पेणमधून रवींद्र पाटील, जतमधून गोपीचंद पडळकर, अकोल्यातून विजय अग्रवाल, खडकवासला येथून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीत जागावाटपासंदर्भात यशस्वी चर्चा झाली आहे. तथापी, उर्वरित सात ते आठ जागांच्या वाटपाबाबत तीन मित्रपक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचं महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना (UBT) 15 आणि काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पाहा यादी)
भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे -
- राम भदाणे- धुळे ग्रामीण
- चैनसुख संचेती – मलकापूर
- प्रकाश भारसाखळे – अकोट
- विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
- श्याम खोडे – वाशिम
- केवलराम काळे – मेळघाट
- मिलिंद नरोटे – गडचिरोली
- देवराम भोंगले – राजुरा
- कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
- करण देवताळे – वरोरा
- देवयानी फरांदे – नाशिक मध्य
- हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
- कुमार आयलानी – उल्हासनगर
- रवींद्र पाटील – पेण
- भीमराव तापकीर – खडकवासला
- सुनील कांबळे – पुणे छावणी
- हेमंत रासने – कस्बापेठ
- रमेश कराड – लातूर ग्रामीण
- देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
- समाधान आवताडे – पंढरपूर
- सत्यजित देशमुख – शिराळा
- गोपीचंद पडळकर – जत
भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजना व विकासकामांच्या सहाय्याने या सर्व उमेदवारांना विजय मिळण्यास मदत होईल हा मला विश्वास आहे. सर्व… pic.twitter.com/aLT59UgdkX
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 26, 2024
महायुतीतील तीन मित्रपक्षांपैकी भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक यादी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 55 जागांवर लढणार आहे.