Maharashtra Akshay Weekly Lottery Result: 'अक्षय साप्ताहिक लॉटरी' चा निकाल आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर; कशी पाहाल विजेत्यांची यादी?
दर बुधवारी अक्षय लॉटरी (Maharashtra Lottery Akshay Weekly Draw) जाहीर केली जाते. आज संध्याकाळी या लॉटरीचा ड्रॉ जाहीर केला जाणार आहे. याकरिता lottery.maharashtra.gov.in ला भेट देऊन तुम्ही आणि निकाल पहा
Maharashtra Lottery Results: महाराष्ट्र राज्य लॉटरीची (Maharashtra Lottery) सुरूवात 12 एप्रिल 1969 दिवशी झाली आहे. त्यानंतर आता नियमित लॉटरीची सोडत जाहीर केली जाते. काही लॉटरी नियमित तर काही दर आठवड्याला जाहीर केल्या जातात. दर बुधवारी अक्षय लॉटरी (Maharashtra Lottery Akshay Weekly Draw) जाहीर केली जाते. आज संध्याकाळी या लॉटरीचा ड्रॉ जाहीर केला जाणार आहे. याकरिता lottery.maharashtra.gov.in ला भेट देऊन तुम्ही आणि निकाल पहा. ही लॉटरी महाराष्ट्र राज्यात कायदेशीर नियमांनुसार मान्यता प्राप्त आहे. साप्ताहिक लॉटरीच्या विजेत्याला 7 लाखाचे बक्षीस दिले जाते. त्यामुळे आजच्या ' अक्षय साप्ताहिक लॉटरी'मध्ये तुम्ही देखील नशीब आजमावणार असाल तर पहा या लॉटरीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
- यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे, त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
- या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
विजेती रक्कम कधी व कशी मिळवाल?
विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुम्हांला 'सागर लक्ष्मी साप्ताहिक लॉटरी' मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2020 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

