मुंबई: आरे मिल्क कॉलनीमध्ये म्हशीच्या गोठ्यात शिरला वाट चुकलेलं बिबट्याचा बछडा; स्थानिकांनी वनात पुन्हा जायला केली मदत!

मुंबई मध्ये आरे मिल्क कॉलनी वसाहतीमध्ये (Aarey's Milk Colony काल (20 ऑक्टोबर) बिबट्याचं एक पिल्लू ( leopard cub) आल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती.

Leopard cub in Aarey Milk Colony (Photo Credits: ANI)

मुंबई मध्ये आरे मिल्क कॉलनी वसाहतीमध्ये (Aarey's Milk Colony काल (20 ऑक्टोबर) बिबट्याचं एक पिल्लू ( leopard cub) आल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. दरम्यान वाट चुकून आलेला हा बिबट्याचा बछडा देखील भेदरलेला होता. तो चुकून आरे कॉलनी मधील जनावरांच्या गोठ्यात शिरला. थोड्या वेळाने स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बछड्याला मार्ग करून दिला. बिबट्याच्या बछड्याचा एक व्हिडिओ स्थानिकांनी काढला असून तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ANI वृत्तसंस्थेने बिबट्याच्या बछड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बिबट्याचा बछडा जेव्हा म्हशींच्या गोठ्यात शिरला तेव्हा तिथे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांचा गडबड गोंधळ व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकायला येत आहे. मात्र काही वेळातच तो बिबट्याचा बछडा वनामध्ये परत गेला.

ANI Tweet

दरम्यान आरे काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारने सुमारे 808 किमी भागाचं वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामध्ये अनेक प्राणी, पक्षी, कीटकं आढळतात. काही प्रजाती तर केवळ आरे मध्येच केवळ आढळत असल्याने या ठिकाणी इतर प्रोजेक्ट्स न आणता वनक्षेत्र सुरक्षित ठेवले जाईल असा राज्य सरकारचा निर्णय आहे.